रावणवाडी ः धारदार शस्त्राने अज्ञात मारेकऱ्यांनी येथील ढाबा चालकाची हत्या केल्याची घटना बुधवारी (ता. २०) सकाळी येथे उघडकीस आली. राजकुमार मदन हरिणखेडे (वय ४५, रा. रावणवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकुमार हरिणखेडे हे आपल्या ढाब्यावर असताना मंगळवारी (ता. १९) रात्रीला अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या केली. घटनास्थळ गावालगतच्या सुनसान परिसरात असल्याने या हत्येची माहिती बुधवारी सकाळी वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसांनीही श्वानपथकासह घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. या प्रकरणी रावणवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार वैभव पवार करीत आहेत.
……………………………..





