24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ कॉलमच्या उड्डाणपुलासाठी महामार्गावरून मोर्चा देवरीत कडकडीत बंद

कॉलमच्या उड्डाणपुलासाठी महामार्गावरून मोर्चा देवरीत कडकडीत बंद

0
260

: सर्वपक्षीय नागरीकांचा उत्सफूर्त सहभाग
गोंदिया –देवरी शहरातील राष्ट्रीय महामार्गावर साकोली व लाखनी शहराच्या धर्तीवर सिंगल कॉलम (पिलर असलेला) उड्डाणपूल तयार करण्यात यावा, या मागणीसाठी देवरी शहरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज, २० मे रोजी देवरी कडकडीत बंद ठेवून भव्य मोर्चा काढला. बंद दरम्यान शहरात शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा नगर पंचायत ते महामार्गावरून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आला. दरम्यान उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड यांना निवेदन देण्यात आले
देवरी येथील राष्ट्रीय महामार्गावर नागरिकांची सुरक्षा आणि शहराच्या भविष्याचा विचार करता ‘ पिलर कॉलम उड्डाणपूल’ होणे अत्यंत गरजेचे आहे.सध्या महामार्ग प्राधिकरणा कडून प्रस्तावित असलेल्या किंवा तयार होत असलेल्या पारंपरिक भिंतीच्या पुलामुळे शहराचे दोन भाग पडण्याची शक्यता आहे. परिणामी स्थानिक व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे. आम्हाला भिंत नको, तर पिलर असलेला उड्डाणपूल हवा, या मागणीला घेवून आज, २० मे रोजी सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाला घेवून संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा होती. आज, दुपारच्या सुमारास देवरी शहरातून मोर्चा काढण्यात आला. त्यात हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. साकोली व लाखनी येथे ज्याप्रमाणे आकर्षक आणि सुटसुटीत सिंगल कॉलम पूल उभारण्यात आले आहेत तसेच बांधकाम देवरीतही करण्यात यावे, अशी नागरिकांनी यावेळी मागणी केली. तहसील कार्यालयाच्या समोरील पूर्व भागातील नाल्यापासून ते थेट मोक्षधामजवळील पश्चिम भागातील नाल्यांपर्यंत हा उड्डाणपूल सलग बांधण्यात यावा. यामुळे शहरांतर्गत वाहतुकीची कोंडी सुटेल आणि भविष्यातील अपघातांनाही आळा बसेल, असा विश्वास नागरिकांनी या प्रसंगी व्यक्त केला आहे. मोर्च्यात सर्व राजकिय पक्षाचे लोकप्रतिनीधी,पदाधिकारी,व कार्तकर्ते आणि सर्व समाजातील पदाधिकारी, सदस्यगण,तसेच शहरातील सर्व व्यवसाईक, नागरीक- महिला, षुरूष युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाहतूकीवर परिणाम
देवरी हे शहर राष्ट्रीय महामार्गावर असल्याने तासाकाठी हजारो वाहन धावतात. मोर्चा महामार्गाच्या एका बाजुच्या रस्त्यावरून काढण्यात आला होता. रायपूरकडून नागपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. एकाच मार्गावरून काहीकाळ वाहतूक वळविण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे बघायला मिळाले.

blank