33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अमर वराडेंची नियुक्ती

गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्षपदी अमर वराडेंची नियुक्ती

0
203

blank

गोंंदिया,दि.२१ः संघटन सृजन अभियाना अंतर्गत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी महाराष्ट्रातील जिल्हा-जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी घेऊन काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून दिलेल्या अहवालाला कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी मान्यता दिली असून गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष पदी काँग्रेसचे नेते अमर वराडे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.महाराष्ट्रातील ६९ शहर व जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आले आहेत.जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाच्या स्पर्धेत माजी आमदार व विद्यमान अध्यक्ष दिलीप बनसोड,बाजार समितीचे उपसभापती राजकुमार पटले यांच्यासह अनेक होते.मात्र काँग्रेसने सर्वांना बाजुला सारत वराडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.

blank