39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉ. कांचन मदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉ. कांचन मदार लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

0
17

blank

रत्नागिरी,दि.०४:-रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या कारवाईत चिपळूण तालुक्यातील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉ. कांचन शिरीष मदार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ४ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर आली आहे. गर्भपातासाठी लागणाऱ्या गोळ्यांचे किट देण्यासाठी लाचेची मागणी केल्याच्या तक्रारीनंतर एसीबीने तातडीने सापळा रचून ही कारवाई केली. या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

blank