39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home गुन्हेवार्ता नागपूरच्या ड्रग्ज तस्कराला भद्रावती हद्दीत अटक! L.C.B ची धडक कारवाई

नागपूरच्या ड्रग्ज तस्कराला भद्रावती हद्दीत अटक! L.C.B ची धडक कारवाई

0
42

blank

भद्रावती:- अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. नागपूरवरून भद्रावतीच्या दिशेने मोठ्या प्रमाणात एम.डी. ड्रग्ज घेऊन येणाऱ्या एका अट्टल तस्कराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत तब्बल १४ लाख ११ हजार धडक कारवाई घडली आहे नागपूर-भद्रावती रोडवरील जमघट हॉटेल समोर. दिनांक २ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांना एका गोपनीय बातमीदाराकडून अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली. अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार हा नागपूरचा रहिवासी आपल्या पांढऱ्या रंगाच्या होंडा अ‍ॅमेझ कारने नागपूरहून भद्रावती येथे मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी घेऊन येत आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न गमावता ३ जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास जमघट हॉटेल समोर चोख नाकाबंदी केली. समोरून येणारी संशयित कार दिसताच पोलिसांनी ती थांबवली आणि कायदेशीर झडती घेतली. यावेळी कारचालक अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार, वय ४० वर्ष, याच्या ताब्यातून तब्बल १६८.९४ ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली. या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत तब्बल ८ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. यासोबतच वाहतुकीसाठी वा परलेली होंडा ‍ॅमेझ कार असा एकूण १४ लाख ११ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे आरोपीविरुध्द कलम ८ (c), २२(c), २९ NDPS Act अन्वये गुन्हा नोंदनों करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंदपूर यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा / सुभाष गोहोका र, सतिश
अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दिपक डोंगडों रे, इमरान खान,हिरालाल गुप्ता, पोअं/किशोर वाकाटे, पो अं/शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.

blank