
बुलढाणा-समृद्धी महामार्गावर ७ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई कॉरिडोरवर इर्टिगा कारने आयशर ट्रकला मागून धडकल्याने एक तरुण ठार, तर तीनजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर बोनेट आयशरला अडकल्याने चालकाने कारला सुमारे दोन ते तीन किलोमीटर फरफटत नेले.मेहकर तालुक्यातीन जात असताना ७ जून रोजी रात्री १२:३० वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडोरवरील चॅनल क्रमांक २७३ वर हा अपघात घडला. नागपूरहून नाशिककडे जाणारा एमएच १५ बीपी ७६६५ क्रमांकाच्या आयशर ट्रकला पाठीमागून आलेल्या एमएच २९ बीपी ५५४३ क्रमांकाच्या इर्टिगा कारने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे कारचे बोनेट आयशरमध्ये पूर्णपणे घुसले.या अपघातात कारचालकाच्या बाजूला बसलेला कृष्णा राठोड (वय ३०, रा. मानोरा, जि. वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला. तर, मानोरा येथील राहुल पवार गंभीर जखमी झाले. कार चालक सत्यपाल राठोड आणि कार्तिक अरुण जाधव हे देखील जखमी झाले आहेत.अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून पळून गेला.





