40.6 C
Gondiā
Monday, June 15, 2026
Home विदर्भ आमदार बडोलेंच्या विरोधात सामाजिक समरसता प्रबोधिनीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

आमदार बडोलेंच्या विरोधात सामाजिक समरसता प्रबोधिनीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
66

blank

गोंदिया,दि.१५ः- अर्जुनी-मोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजकुमार बडोले यांच्या विरोधात सामाजिक समरसता रजनीगंधा प्रबोधन समितीच्या वतीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन तहसीलदार, अर्जुनी-मोर यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
निवेदनात असा आरोप करण्यात आला आहे की, एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार राजकुमार बडोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशाचे आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाचे प्रतीकात्मक अवमूल्यन करणारे कृत्य केले. त्यामुळे स्वयंसेवकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार राजकुमार बडोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच समाजात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.दरम्यान, या आरोपांवर आमदार राजकुमार बडोले यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.त्यांची भूमिका समोर आल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.