38.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home राजकीय शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा;राकाँ (शप) गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा;राकाँ (शप) गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
7

blank

गोंदिया : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा
दर्शवित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निवेदन सादर करण्यात आले.
माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने शेतकरीविरोधी जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात व सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष सौ. मेघाताई बिसेन, जिल्हा सरचिटणीस अजित नायर, जिल्हा सरचिटणीस नासिर घाणीवाला, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पारधी, महिला तालुका अध्यक्ष सौ. मंदाताई टेंभरे, व्ही. टी. पटले सर, माजी सरपंच प्रकाश पटले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातत्याने संघर्ष करत असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी भूमिका यावेळी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.