24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ मुल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम धुर्वे यांचे निधन

मुल्ला येथील सामाजिक कार्यकर्ते तुकाराम धुर्वे यांचे निधन

0
89

देवरी,दि.२१-तालुक्यातील मुल्ला  ग्रामपंचायतीचे माजी सदस्य तथा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था लोहाराचे उपाध्यक्ष तुकाराम सुकाजी धुर्वे यांचे काल रात्री साडेनउ वाजेच्या सुमारास अल्पशः आजाराने निधन झाले.

श्री. धुर्वे हे एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते आणि मनमिळावी वृत्तीचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या असामायिक निधनाने मुल्ला गावात शककळा पसरली आहे. त्यांचे कुटुंबात त्यांची पत्नी, मुले, नातवंड आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांचेवर मुल्ला येथील मोक्षधामावर दुपारी ११ च्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

blank