32.4 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home राजकीय भाजपाचे राजीव पोतदार यांना ६८२ तर काँग्रेसच्या अतुल लोंढे यांना १३० मते

भाजपाचे राजीव पोतदार यांना ६८२ तर काँग्रेसच्या अतुल लोंढे यांना १३० मते

0
13
नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद पोटनिवडणूक निकाल जाहीर
नागपूर, दि. २२ – महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 अंतर्गत नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदार संघ पोटनिवडणुकीची मतमोजणी आज घेण्यात आली. यात भाजपाचे राजीव पोतदार यांना ६८२ तर इंडियन नॅशनल कॉंग्रेसच्या अतुल लोंढे यांना १३० मते मिळाली. एकूण ८१२ मते वैध ठरली तर ११ मते अवैध ठरली. भाजपाचे राजीव पोतदार ५५२ मतांनी विजयी झाले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात सकाळी आठ वाजता निवडणूक निरिक्षक संजय यादव आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद त्यांच्या निरीक्षणाखाली मतमोजणीला सुरुवात झाली.
मतमोजणीसाठी एकूण चार टेबल ठेवण्यात आले. अतुल लोंढे यांनाएकूण १३० मते मिळाली. भाजपाचे डॉ. राजीव पोतदार यांना ६८२ मते मिळाली.
दि. १८ जून रोजी झालेल्या मतदानात १४ मतदान केंद्रांवर ८३६ पैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागपूर शहर ११ व उमरेड, कामठी प्रती एक अशा १३ सदस्यांनी मतदान केले नव्हते. या निवडणुकीत एकूण सुमारे ९८.४४ टक्के मतदान झाले होते.