32.5 C
Gondiā
Tuesday, June 23, 2026
Home क्रीडा क्रीडा विभागाच्या पुढाकारातून गोंदियात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

क्रीडा विभागाच्या पुढाकारातून गोंदियात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

0
11

गोंदिया, दि.23 : 21 जून रोजी बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन गोंदिया येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गोंदिया यांच्या पुढाकारातून जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत, भारत स्कॉउट गाईड, अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ, जन शिक्षण संस्था, नशाबंदी मंडळ, खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र, जिल्हा योग संघटना तसेच विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे सकाळी 7.30 ते 7.45 या वेळेत कार्यक्रम पार पडला. उद्घाटन उपनिरीक्षक (आयटीबीपी) दुर्गेश वाघमारे यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून गट शिक्षणाधिकारी तिरोडा श्री. बरीकर, सौरभ निशाद, राजू गोधेरे, शशांक कोसरकर, विनायक डोंगरवार, अॅड.पिंकी गमरे, अॅड.शैलेंद्र गडपायले, डॉ.रश्मी बोपचे, नितीन गजभिये, प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी भोजराज चौधरी, तालुका क्रीडा अधिकारी पूजा श्रीवास उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले. योग प्रशिक्षक माधुरी परमार यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गेश वाघमारे यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली.

कार्यक्रमात खेलो इंडिया अंतर्गत प्रशिक्षण घेणारे खेळाडू, विशेषतः बास्केटबॉल खेळाडू आणि सुमारे 100 नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, त्रिकोणासन, भुजंगासन, सेतूबंधासन, शवासन यासह विविध योगासने तसेच अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी, शीतली प्राणायाम व ध्यानाचा सराव करण्यात आला.याशिवाय जलतरण तलावात स्वप्नील यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पाण्यात योगाभ्यासाचे विशेष सत्र घेण्यात आले, ज्यामध्ये जलतरणपटूंनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भोजराज चौधरी यांनी केले. संचालन पराग खुजे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रितेश पाखमोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किसन गावड, नरेंद्र कोचे, शिवचरण चौधरी, शेखर बिरणवार तसेच इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.क्रीडा विभागाच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये योगाबद्दल जागरूकता वाढून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.