26.9 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ मुकाअंनी केली जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी

मुकाअंनी केली जलयुक्त शिवारच्या कामांची पाहणी

0
22
blank
blank

गोंदिया, दि. १5 : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तिरोडा तालुक्यातील जिल्हा परिषद लघु सिंचाई विभागाअंतर्गत चांदोरी खुर्द, गोंडमोहाडी, अत्री, बोदा, बोरा, सोनेगाव येथील सिमेंट बंधारा तलावाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच यांच्याशी कामाबद्दल व पाणीसाठय़ाचा उपयोग कोणत्या पिकासाठी करता याची जाणीव करुन घेतली व शेतकर्‍यांना गहू, चना, भाजीपाला हे पीक घेण्यासाठी सल्ला पण दिला. याप्रसंगी त्यांच्यासोबत तिरोडा उपविभागीय अधिकारी चौधरी, कनिष्ठ शाखा अभियंता चौधरी, सरपंच लिला गोंधुळे, उपसरपंच हुपराज जमईवार, बळीराम धांडे, तौषीक मालाधारी, भाऊराव गोंधुळे, मुन्ना नंदेश्‍वर उपस्थित होते.

blank