24.5 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home शैक्षणिक प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालय

प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालय

0
29

गोंदिया : प्रोग्रेसिव्ह चित्रकला महाविद्यालयाचा विद्यार्थी विजय रामेश्‍वर कटरे याने फॅशन फॉर आर्ट-२0१६ कला प्रदर्शनासाठी आपली कलाकृती सादर केली होती. यात त्याच्या कलाकृतीची निवड करण्यात आली. त्याने तयार केलेल्या कलाकृतीचे शिर्षक ‘मदर अँण्ड चाईल्ड’ होते. महाविद्यालयातून एकूण १४ विद्यार्थ्यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या होत्या. तसेच संपूर्ण देशभरातून विद्यार्थी व हौशी कलावंतांनी आपल्या कलाकृती सादर केल्या.सदर कलाप्रदर्शन पुणे येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हे कलाप्रदर्शन विद्यार्थी व प्रेक्षकांसाठी खुले राहणार असून देशभरातून रसिक बघण्यासाठी येणार असल्याची माहिती कलाप्रदर्शन प्रमुख यांनी सांगितले. विद्यार्थ्याच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष पंकज कटकवार, सचिव नीरज कटकवार, प्राचार्य ओ.टी. रहांगडाले, अभय गुरव, विलास नागदेवे, कुमुदिनी तावाडे, कन्हैया आंबेडारे, सिमरण बास्के, तपनकुमार सतदेवे, राकेश पहिरे यांनी त्याचे कौतुक केले.

blank