|
नागपूर : राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना संपूर्ण शिष्यवृत्ती मिळावी यासाठी भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीने १0 फेब्रुवारी २0१७ रोजी संविधान चौकात धरणे देऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी, जातीनिहाय जनगणना, ओबीसी समाजात फुले शाहू आंबेडकरांचे विचार रुजविण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर विशेष कार्यक्रम राबविण्याचा विचार मांडण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १0 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात विद्यार्थ्यांसह विविध शाखा सहभागी होतील. |





