34.7 C
Gondiā
Friday, June 26, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्ह्यात २ ने वाढली सारस पक्ष्यांची संख्या, यावर्षी 3२ पक्ष्यांची नोंद

गोंदिया जिल्ह्यात २ ने वाढली सारस पक्ष्यांची संख्या, यावर्षी 3२ पक्ष्यांची नोंद

0
11

खेमेंद्र कटरे/गोंदिया :२०२६ च्या वार्षिक सारस पक्षी गणनेनुसार गोंदिया जिल्ह्यातील ५३ सारस अधिवास क्षेत्रापैकी १५ अधिवास क्षेत्रात ३२ सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.तर शेजारील भंडारा जिल्ह्यांमध्ये सारस गनणेचे काम सुरु आहे.सोबतच मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात ५० सारस पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. २० जून  रोजी गोंदिया व बालाघाट वनविभाग व सेवा संस्थानसह जिल्ह्यातील विविध अशासकीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सारस पक्षी प्रगणनेचे आयोजन करण्यात आले होते.

बाघ व वैनगंगा नद्या महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील अनुक्रमे गोंदिया व बालाघाट जिल्ह्यांना विभागणाऱ्या प्रमुख नद्या आहेत. भौगोलिकदृष्ट्या या नद्यांच्या दोन्ही तीरांवरील परिसरांमध्ये समान हवामान, जमीन प्रकार आणि शेती पद्धतीमुळे जैवविविधतेत अनेक साम्ये आढळतात. या परिसंस्थात्मक साम्यामुळे काही सारस पक्ष्यांचे जोडपे अधिवास आणि अन्नसंधानासाठी या दोन्ही प्रदेशांमध्ये मुक्तपणे संचार करताना आढळतात. यामध्ये विशेषतः प्रजनन काळात किंवा विश्रांतीसाठी दोन्ही बाजूंच्या शेतक्षेत्रांचा वापर होत असल्याचे निरीक्षणातून स्पष्ट झाले आहे.न्यायालयाच्या निर्देशानंतर गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्यास सुरवात केली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सारस पक्ष्यांचे अधिवास असलेल्या गोंदिया, तिरोडा व आमगाव तालुक्यांतर्गत एकूण ५३ वेगवेगळ्या ठिकाणी जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी व गोंदिया वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही गणना सकाळी ४.४५ ते ० वाजेपर्यंत केलेली असून सारस पक्षी प्रगणनेमध्ये एकूण ३२ सारस पक्ष्यांची नोंद झालेली आहे.सारस पक्ष्यांची प्रगणना करण्यासाठी चमू तयार करण्यात आले होते. प्रत्येक चमूमध्ये स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, स्थानिक प्रतिनिधी/शेतकरी, वन विभागातील वनपाल, वनरक्षक असे एकूण २ ते ४ व्यक्ती असे १४०-१५० सदस्यांनी या नोंदणीत सहभाग घेतला.सारस पक्षी प्रगणनेकरीता गोंदिया जिल्ह्यातील सेवा संस्था व इतर अशासकीय संस्थेचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी तसेच गोंदिया,भंडारा व बालाघाट वनविभागातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून सारस पक्ष्यांचे अधिवास असलेले पाणथळ जागा, नद्या, शेतांमध्ये, तलावांजवळ जाऊन पाहणी करुन सारस पक्ष्यांची प्रगणना केली.

सदर सारस पक्षी गणना पवन जोंग, उपवनसंरक्षक गोंदिया वनविभाग, सावन बहेकार अध्यक्ष सेवा संस्था गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.सदर गणनेत गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मंगेश गोंदावले यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच सहाय्यक वनसंरक्षक (तेंदू व कॅम्प),सहाय्यक वनसंरक्षक (रोपे व वन्यजीव),वनपरिक्षेत्र अधिकारी गोंदिया व आमगाव तसेच सेवा संस्थेचे शशांक लाडेकर,कन्हैया उदापुरे, अभिजित परिहार,डीलेश कुसराम,सुशील बहेकार,भास्कर कापसे,मुकुंद धुर्वे (BNHS), वनविभागातील वनकर्मचारी व जिल्ह्यातील अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक, सारस मित्र, शेतकरी यांचे सहकार्य लाभले. सारस पक्षी गणना दरम्यान दोन दिवस नदी घाट परिसरात (सारस पक्षी विश्रांती स्थळांजवळ) मानवी हालचालींवर मर्यादा घालण्याची विनंती जिल्हा पोलिस अधीक्षक गोंदिया यांना करण्यात आली होती.

महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना २०२६
गोंदिया जिला  – ३२
बालाघाट जिला – ५०
भंडारा जिला  – मोजणी सुरु

महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना २०२
गोंदिया जिला  – ३०
बालाघाट जिला – ४८
भंडारा जिला  – ०४

महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना 20२४

गोंदिया- २८
भंडारा- 45
बालाघाट- 3
महाराष्ट्र मध्यप्रदेश सारस गणना 2023
गोंदिया – 31
बालाघाट – 49
भंडारा – 04
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2022
गोंदिया- ३४
बालाघाट– ४५
भंडारा – 0३
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2021
बालाघाट : ४७
गोंदिया : ३९
भंडारा : ०२
महाराष्ट्र मध्यप्रदेश राज्य सारस संख्या 2020
गोंदिया- 45
बालाघाट- 56
भंडारा- 02
चंद्रपूर -01

सारस पक्ष्यांचे अधिवास क्षेत्राचे प्रमाण केवळ घटतच नाही, तर त्याची गुणवत्ता (नैसर्गिक सुसंगतता) देखील दिवसेंदिवस खालावत आहे. ही बाब सारस पक्ष्यांच्या प्रजनन यशात थेट अडथळा निर्माण करणारी असून, येत्या काळात याचे गंभीर परिणाम जैवविविधतेवर व संपूर्ण पर्यावरण तंत्रावर दिसून येण्याची शक्यता आहे. २०२४ मध्ये सारस पक्ष्यांची ६ घरटी तयार झालेली होती पण मानवी हस्तक्षेप किंवा पर्यावरणीय बदलामुळे २०२५ मध्ये १ घरटी कमी झाली.या पार्श्वभूमीवर, सारस पक्ष्यांचे विद्यमान अधिवास क्षेत्र तातडीने संरक्षित करणे, त्याचे पुनरुज्जीवन (restoration) करणे आणि नव्या संरक्षण क्षेत्रांची योजना आखणे ही काळाची गरज आहे.-सावन बहेकार अध्यक्ष सेवा संस्था