तिरोडा,दि.२६ः धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प विभागाच्या कार्यालयात आमदार विजय रहांगडाले यांच्या उपस्थितीत भजेपार येथील शेतक-यांनी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ चे पाणी भदभद्या तलावात सोडण्याच्या विषयाला घेऊन बैठक घेत संबधित विभागाच्या अधिकार्याना पाणी सोडण्याचे निर्देश दिले.
धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ चे पाणी भदभद्या तलावाच्या लाभक्षेत्रास देण्याकरीता प्रगतीपथावर असलेल्या कामामुळे पाणी हे उजव्या कालव्याच्या १.५० कि.मी. पुढील शेतक-यांना मिळणार आहे. त्यामुळे उजव्या कालव्याच्या १.५० कि.मी. वरील व डाव्या कालव्यावरील भजेपार येथील सर्व शेतकरी धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या प्रत्यक्ष लाभापासुन वंचित राहणार आहेत. यामुळे सदर पाणी उजव्या कालव्याच्या १.५० कि.मी. पुढील भागात न सोडता थेट भदभद्या तलावात सोडण्यात यावे असे आमदार रहागंडालेे यांनी सांगितले.त्याअनुषंगाने विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत मस्कावार यांनी भदभद्या तलावाच्या एकुण लाभक्षेत्र अंदाजे ५५० हे. असुन उजव्या कालव्याच्या १.५० कि.मी. पुढील ठिकाणी पाणी सोडुन लाभक्षेत्र ३७० हे. सिंचीत करणे व उर्वरीत लाभक्षेत्र १८० हे. भदभद्या तलावावरुन सिंचीत करणे असल्याचे सांगितले.तसेच भदभद्या तलावाचे तलांक उजव्या कालव्याच्या १.५० कि.मी. ठिकाणापेक्षा अंदाजे ५.०० मी. उंचीवर असल्याने थेट भदभद्या तलावात प्रवाही नलिकेद्वारे पाणी सोडणे शक्य नाही असे सांगितले.तरी सर्व लोकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली व धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ हि उपसा सिंचन योजना असुन आम्हाला सुद्धा उपसा करुन पाणी द्यावे अशी मागणी केली.यावेळी प्रामुख्याने कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले,जि.प.सदस्य जगदीश बावणथडे,ग्रा.प.सरपंच शिशुपाल रहांगडाले.ग्रा.प.सदस्य तारेंद्र बिसेन.नीरज असाटी, पत्रकार मुकेश अग्रवाल,विजय खोब्रागडे, रमाकांत खोब्रागडे,राधेश्याम नागपुरे,राजेशकुमार तायवाडे,नितीन आगाशे व भजेपार येथील शेतकरी उपस्थित होते.





