37.7 C
Gondiā
Saturday, June 27, 2026
Home विदर्भ गांजा, ड्रग्स माफियांचा बंदोबस्त करा;जिल्हा काँग्रेस कमेटीचे पोलिस उपअधिक्षकांना निवेदन

गांजा, ड्रग्स माफियांचा बंदोबस्त करा;जिल्हा काँग्रेस कमेटीचे पोलिस उपअधिक्षकांना निवेदन

0
52

गोंदिया : मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी रेल्वे गाड्यांसह चारचाकी वाहनांने गांजाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई केली. या कारवाई लोखाचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. मात्र शहरासह जिल्ह्यात गांजा व इग्स माफिर्याचे जाळे पसरतच चालल्याने कारवाई करून सुद्धा तस्कर गब्बर झाले आहे. परिणामी अल्पवयीन मुले, युवक गांजा व ड्रग्सच्या आहारी गेले आहेत. तेव्हा या गांजा, ड्रग्स सारख्या अमली पदार्थांची विक्री व माफियांवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच पोलीस उपधीक्षक यांना निवेदन सादर करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून गोंदिया शहरांमध्ये विशेष करून शाळा महाविद्यालय आणि खाजगी कोचिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ड्रग्सचे व्यसन लागल्याचे अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणासाठी शहरात पाठवितात मात्र हे युवक आता ड्रग्स सारख्या अमली पदार्थ्याच्या आहारी जावू लागल्या आहेत. बरेच पालक आपल्या मुलांना भाड्याची खोली किंवा वस्तीगृहामध्ये राहायला लावून शिक्षण घेण्याची व्यवस्था करून देतात. मुलेएकटे असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी व्यसनाधीन होत असल्याचे तक्रारी मागील अनेक दिवसांपासून गोंदिया शहरांमध्ये वाढलेली आहे. ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर कुटुंबातील पालक वर्ग आपल्या मुलांना अतिशय काबाड कष्टाने कमावलेला पैसा आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. परंतु या मुलांना व्यसनाधीन करण्याचे कार्य शहरात वावरणारे ड्रग्स माफिया करत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष करून शाळा महाविद्यालय, खाजगी कोचिंग, खाजगी वस्तीगृह च्या परिसरात या ड्रग्स माफियांचा धंदा जोरात चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु याबाबतीत पोलीस प्रशासन मात्र गप्प आहे त्यामुळेड्रग्ज माफीयांचा धंदा जोरात चालू आहे. याच्यामध्ये संपूर्ण कुटुंबाचा उज्वल भविष्य असलेले पोर उध्वस्त होत आहेत. या ड्रग्स माफियांना वेळीच आवर घालणं आवश्यकआहे. याबाबतीत आज जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर वराडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपधीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या ड्रग्स माफियांवर वेळीच कार्यवाही करून आवर घातला नाही तर गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला.यावेळी पी.जी.कटरे, राजकुमार पुराम, विशाल अग्रवाल, एड.दुष्यंत किरसाण, शहर काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चौधरी, जितेंद्र कटरे, डेमेद्र, रहांगडाले, जमील भाई पठाण, झहीर भाई अहमद, बाबा मिश्रा, महेश उके, अमन तिघाला जगदीश चुटे, बलजीत सिंग बग्गा, शैलेश बाहेकर, रंजीत गणवीर, जीवन शरणागत, कुणाल शेंडे आणि इतर पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.