25.7 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ कुडवा येथे स्व.वसंतरावजी नाईक जयंतीनिमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

कुडवा येथे स्व.वसंतरावजी नाईक जयंतीनिमित्त वृक्ष वाटप कार्यक्रम

0
10

गोंदिया,दि.०१ः वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना तसेच समस्त गोर बंजारा परिवार गोंदिया तर्फे हरित क्रांतीचे प्रणेते, धवल क्रांती, रोजगार हमी योजना,पंचायत राज व्यवस्थेचे जनक,आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, सर्वाधिक *काळ मुख्यमंत्री पद सक्षमपणे सांभाळणारे आधुनिक कृषिप्रधान भारताचे कृषीसंत, महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त वृक्ष वाटप वृक्ष लागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
मागील १२ वर्षापासून प्रत्येक वर्षी १ जुलै स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कुडवा चौक येथे *वृक्ष वाटप करून साजरी करण्यात येते.
ही परंपरा कायम ठेवत आज १ जुलै रोजी भुवन नागपुरे पंचायत समिती सदस्य,राज शुक्ला नगरपरिषद सदस्य, यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतरावजी नाईक यांचे प्रतिमेचे पूजन करून यांच्या शुभहस्ते वृक्ष वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुण्याने हरितक्रांतीचे प्रणेते यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी करत असलेले वृक्ष वाटप अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले तसेच आपण सर्व मिळून करत असलेल्या चांगल्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाप्रसंगी वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी महेश राठोड (अध्यक्ष) विलास राठोड (कोषाध्यक्ष) प्रदीप राठोड (सचिव) मनोज चव्हाण, अरविंद राठोड राम राठोड, रोहन जाधव, तसेच सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.