23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय तर्फे स्व. अजितदादा पवार जयंती दिवस साजरा

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय तर्फे स्व. अजितदादा पवार जयंती दिवस साजरा

0
12

गोंदिया,२२ जुलै-गोंदिया शिक्षण संस्थे द्वारे संचलित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयातर्फे महाराष्ट्राचे लोकनेते स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन,संचालक निखिल जैन, प्रभारी प्राचार्य डॉ.मनोज पटले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्व . अजितदादा पवार यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी डॉ. मनोज पटले यांनी अजितदादांच्या जीवनाशी निगडित प्रेरणादायी घटना विषयी उपस्थितांना सांगितले. तसेच महाविद्यालयाचे वरिष्ठ कर्मचारी श्री. साखरे यांनी सुद्धा अजितदादांच्या कामगिरीबद्दल आपले मनोगत मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ.स्नेहा जैस्वाल यांनी केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank