-
सनद, ७/१२, वनहक्क पट्टे, ट्रॅक्टर आणि आरोग्य सेवांचे एकाच छताखाली वाटप
-
आमदार विजय रहांगडाले यांच्यासह दिग्गज लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती
तिरोडा :राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तिरोडा येथे भव्य ‘महाराजस्व अभियान’ अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. शासनाच्या लोकाभिमुख योजना आणि विविध सेवा थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला तिरोडा आणि परिसरातील नागरिकांचा अभूतपूर्व आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली
या अभियानात महसूल यंत्रणेसह विविध प्रशासकीय विभागांनी स्टॉल्स मांडून ५,३७६ नागरिकांना विविध दाखले व योजनांचे प्रत्यक्ष लाभ दिले.
-
महसूल व भूमी अभिलेख: नागरिकांना सनद वाटप, वारस फेरफार, नाव दुरुस्ती आदेश, जमिनीचे पोट हिस्सा वाटणीपत्र, अतिक्रमण जागेचे पट्टे, जातीचे व अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, संजय गांधी योजनेची मंजूर प्रकरणे, रेशन कार्ड, वनहक्क पट्टे आणि मैय्यत लाभार्थी वारस ७/१२ चे वाटप करण्यात आले.
-
कृषी व पशुसंवर्धन विभाग: शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वाटप, सबसिडी प्रमाणपत्रे, ‘पीएम किसान’ योजना पात्र प्रमाणपत्रे, तसेच जनावर व शेळीपालनासाठी सबसिडी प्रमाणपत्रांचे वाटप झाले.
-
आरोग्य व महिला बालविकास: गरोदर मातांना विशेष किट, महिला बचत गटांना धनादेश वितरण, सिकलसेल व सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली.
-
इतर विभाग: पोलीस विभागातर्फे सायबर गुन्ह्यांतील परतावा व मोबाईल वाटप, महावितरणतर्फे सौर ऊर्जा सबसिडी प्रमाणपत्रे, वनविभागातर्फे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धनादेश आणि कुंपण योजना लाभ, तसेच मत्स्यव्यवसाय विभागाकडून बीज वाटप करण्यात आले.
दिग्गज लोकप्रतिनिधींची मांदियाळी
या भव्य उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. कार्यक्रमाला तिरोडा-गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय रहांगडाले, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती रजनी कुंभरे, नगरपरिषद अध्यक्ष अशोक असाटी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण,याशिवाय जि.प. सदस्य पवन पटले, छत्रभूज बिसेन, किरण पारधी, जगदीश बावणथडे, तुमेश्वरी बघेले, माधुरी रहांगडाले, पं.स. उपसभापती सुनंदा पटले, कृउबास उपसभापती भूमेश्वर रहांगडाले, पं.स. सदस्य हुपराज जमाईवार, चेतलाल भगत, कविता सोनेवाने, प्रमिला भलाई, दिपाली टेंभेकर, न.प. सभापती देवेंद्र तिवारी, संजय बैस, अनिकेत कटरे, रवी येरके, नम्रता भुते, कृउबास संचालक रवींद्र वहिले, मिलिंद कुंभरे, भाजप उपाध्यक्ष मदन पटले, आणि विधानसभा प्रमुख भाऊराव कठाणे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय यंत्रणेचे उत्कृष्ट नियोजन
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार नारायण ठाकरे, प्रज्ञा भोकरे, पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, सरीपुत्र धोटे, महिला बालविकास अधिकारी विनोद चौधरी, तालुका कृषी अधिकारी आकाश गेडाम आणि लालन राजपूत यांच्यासह संपूर्ण महसूल व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.नागरिकांना शासकीय कार्यालयांचे खेटे मारावे लागू नयेत आणि एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळाव्यात, यासाठी राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वसामान्य जनतेतून उदंड कौतुक होत असून, अशा अभियानांचे वारंवार आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.





