गोंदिया : सन १९३८ पासून विदर्भराज्याची मागणी होत आहे. दरम्यानच्या काळात विदर्भ राज्याचा ठराव पारीत करण्यात आला. अनेक नेमलेल्या समितींनी विदर्भ राज्य निर्मितीची शिफारस देखील केली. मात्र विदर्भराज्याच्या निर्मितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. १२२ वर्षापासून विदर्भ राज्यासाठी लढा सुरू आहे. या लढ्याला आता डिसेंबर २०२७ मध्ये मुहूर्तरूप दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा विदर्भराज्य आंदोलन समितीच्या वतीने देण्यात आला. यासाठी विदर्भ राज्यात ठिकठिकाणी जनजागृती मोहिम राबविली जात आहे. विदर्भातील जनता आता पेटून उठणार? असाही विश्वास विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
(ता. २१) विदर्भ राज्य आंदोलन समितीची गोंदिया येथे अतिमहत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अॅड. वामनराव चटप, मुकेश मासुलकर, अरूण केदार, सुनिल चोखारे, डॉ. रमेश गजबे, छैलबिहारी अग्रवाल, अतुल सतदेवे, राखी भारव्दाज, वसंत गवळी आदि उपस्थित होते. बैठकीनंतर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भाकडे दुर्लक्ष करण्यात आले. विदर्भावर अन्याय केला जात आहे. जोपर्यत विदर्भ राज्य स्वतंत्र होणार नाही, तोपर्यंत विदर्भाचा विकास होणार नाही, हे निश्चितपणे राज्यकर्त्यांच्या वागणुकीवरून समजून येत आहे. गेल्या १२२ वर्षांपासून विदर्भराज्याच्या निर्मितीसाठी लढा सुरूआहे. या लढ्याला आता अंतिमरूप देण्याच्या अनुसंगाने विदर्भ आंदोलन समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘महाराष्ट्र वादी चले जाव’ महाराष्ट्र वाद्यांनो विदर्भ
सोडा या मुळ घोषणांना घेवून विदर्भातील जनतेत जनजागृती करण्यात येणार आहे. २५ जुलै रोजी सिंदखेड राजा येथे विदर्भनिर्माण जनसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनी नागपूर येथे दिक्षाभुमी ते संविधान चौक लॉग मार्च काढण्यात येणार आहे. त्यानंतर जाहिर सभा होणार आहे. या कार्यक्रमात विदर्भातील हजारोच्या संख्येत नागरिक सहभागी होणार आहेत, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अॅड. वामनराव चटप यांनी दिली





