23.3 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home गुन्हेवार्ता भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला

भरदिवसा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती वर प्राणघातक हल्ला

0
62

डोक्यावर धारदार शस्त्राचे 2 वार गळ्यातील सोन्याची चेन वअंगठी लंपास
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू रामनगर पोलिसांचा आरोपीचा शोध सुरू
गोंदिया:- गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील बांध तलाव येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिकावर भरदिवसा प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हल्लेखोरनी लूट करून फरार होण्यापूर्वी व्यक्तीच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. या घटने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हद्दीतील सूर्याटोला येथील बांध तलावाच्या परिसरात नेहमीप्रमाणे सकाळी 7 वाजता प्रदीप अपाले वय 68 वर्ष हे मॉर्निंग वॉक करून घरी परत होते. याच वेळी मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोराने प्रदीप अपाले यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने दोन वार केले. जखमी अवस्थेत खाली पडलेल्या व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि बोटातील सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या प्रदीप अपाले यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तपास करत आहे. परिसरातील CCTV फुटेज तपासले जात आहेत.

*नागरिकांमध्ये भीती*
सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांसाठी बांध तलाव परिसर सुरक्षित समजला जातो. मात्र भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीला अटक करून परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

blank