23.2 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home शैक्षणिक आदिवासी व दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

आदिवासी व दुर्गम भागातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप!

0
19

Aop गोठणगावं व उपजीविका सामाजिक संस्थेचा उपक्रम!

गोंदिया– जिल्हा पोलीस दादालोरा एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. Aop गोठणगाव व उपजीविका सामाजिक संस्था नागपूर च्या वतीने आदिवासी व दुर्गम भागातील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Aop गोठणगाव परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केळवद व गोठणगाव येथील पहिली ते चौथी च्या एकूण 100 विद्यार्थ्यांना प्रत्येकी स्कूल बॅग, 6 वह्या व कंपास बॉक्स देण्यात आले तसेच प्रत्येक शाळेला हॉलिबॉल व फुटबॉल वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपजीविका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धीरज गलगले व संस्थेचे पदाधिकारी, माऊली सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुहास खरे, पोलिस उपनिरीक्षक शुभम नवले पोलीस स्टेशन केशोरी, पोउपनि अरविंद जाधव एसआरपीएफ तसेच शाळेचे शिक्षक बुधवंत सर, ठाकरे सर आणि ढाकोळे सर उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन aop गोठणगाव चे माजी प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निळकंठ गित्ते तसेच साय्यक फौजदार अंबुले, हवालदार भावते व थेर यांनी केले आहे.

blank