24.5 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home विदर्भ “परीसस्पर्श” ने 18 वंचिताना शोधुन प्रवाहात आणले,जनजागृती आली फळाला

“परीसस्पर्श” ने 18 वंचिताना शोधुन प्रवाहात आणले,जनजागृती आली फळाला

0
13

परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान मोहिम दि.10 जुलै ते 25 जुलै 2026 
देवरी,सालेकसा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 410 गावातील 31722 घरांना भेटी                                                        आरोग्य विभागातील 93 टिममार्फत तपासणी व जनजागृती आली फळाला

गोंदिया दि. 29 : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दि.10 जुलै ते 25 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील तीन अतिदुर्गम तालुक्यात “परीसस्पर्श कुष्ठरोग अभियान ” राबविण्यात आले.परीसस्पर्श कुष्ठरोग अभियातुन अतिजोखमीच्या व दुर्गम भागातील गावातील लोकांवर लक्ष ठेवुन तपासणी व जनजागृती करण्यात आली.जिल्हाधिकारी मंदार पत्की,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोतुंला,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांच्या मार्गदर्शनात मोहिम यशस्वी राबविण्यात आली.

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधुन त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे,नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडीत करुन होणारा प्रसार कमी करणे हे परीसस्पर्श कुष्ठरोग अभियानाचा उद्देश होते.या मोहिमेतंर्गत हार्ड टु रिच अतिदुर्गम गावातील लोकांचे नियमित/विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या/दुर्लक्षित राहणाऱ्या गटांवर व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.भाग्यश्री गावंडे यांनी दिली आहे.

“परीसस्पर्श” कुष्ठरोग मोहिमेतुन जिल्ह्यातील देवरी,सालेकसा व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 410  गावातील 1,33,270   हार्ड टु रिच अतिदुर्गम गावातील वंचित गटातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन 93 आरोग्य पथकांनी मोहिमेदरम्यान निवडलेल्या गावातील लोकसंख्येचे सर्वेक्षण करुन कुष्ठरोगाचे लक्षणे असलेल्या 210 संशयित व्यक्तींना शोधुन काढले.सर्व संशयितांची विशेष तज्ञांकडुन तपासणी अंती 18 लोकांना तपासणी करुन प्रवाहात आणले आहे. त्यात 6 सांसर्गिक रुग्ण (एम.बी.) व 12 सांसर्गिक रुग्ण (पी.बी.)रुग्ण आहेत.11 पुरुष व 7 स्त्री उपेक्षित/वंचित रुग्णांना मोफत औषधी सुरु केल्याची माहीती सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय यांनी दिली आहे.

तीनही तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आशा सेविका,स्वयंसेवक,आरोग्य पर्यवेक्षक,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक,फार्मासिस्ट यांनी “परीसस्पर्श” मोहीम यशस्वी केल्याबद्दल डॉ.महेंद्र धनविजय यांनी त्यांचे कौतुक केले आहे.