25.7 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home Top News तलावात आंघोळीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील...

तलावात आंघोळीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील घटना

0
15

गोरेगाव: तालुक्यातील मौजा मुंडीपार येथे तलावात आंघोळीसाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुनीत किशोर गमधरे (वय अंदाजे २२ वर्षे, रा. मुंडीपार) असे मृत तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, काल सोमवारी (दिनांक १० ऑगस्ट २०२६) सायंकाळी ५ ते ६ च्या सुमारास पुनीत हा आपल्या ३ ते ४ मित्रांसोबत गावाजवळील तलावामध्ये आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पुनीत अचानक खोल पाण्यात बुडू लागला. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपयश आले.

या घटनेची माहिती तत्काळ गावकरी आणि पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबवली आणि पुनीतला पाण्याबाहेर काढले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.एन ऐनवेळी झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मुंडीपार गावावर आणि गमधरे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची गोरेगाव पोलिसांत नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

blank