23.8 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ देवरी न.पं.चे तीनही सभापती राष्ट्रवादीच्या पारड्यात

देवरी न.पं.चे तीनही सभापती राष्ट्रवादीच्या पारड्यात

0
28

देवरी,०२-देवरी नगर पंचायतीमधील सभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. आज (ता ०२) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे तीनही सभापतिपदाचे उमेदवार निर्विरोध निवडून आले.
निवडून आलेल्यांमध्ये बांधकाम सभापती म्हणून आफताब शेख, अर्थ व नियोजन सभापती म्हणून रितेश अग्रवाल आणि महिला व बालकल्याण सभापतिपदी दqवदर कौर भाटिया या निवडून आल्या. उल्लेखनीय म्हणजे विरोधी पक्ष म्हणून असलेल्या भाजपने एकाही पदासाठी नामनिर्देश पत्र दाखल केले नाही. निवडप्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रमेश ताराम, नगराध्यक्ष सुमन बिसेन, छोटू पटले, नानू मुदलियार, जितेश टेंभरे,शैलेश वासनिक, लखन बहेलिया, नरेंद्र बेलगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

blank