`ओबीसी असाल तर, मोर्चात दिसाल`चे गोंदियात वादळ

0
10

गोंदिया- ओबीसी असाल तर मोर्च्यात दिसाल…, नवे पर्व ओबीसी सर्व अशा घोषणा देत ओबीसी बाईक रॅलीचे वादळ अखेर गोंदिया शहरात दाखल झाले. ओबीसी महामोर्च्याची पूर्वतयारी म्हणून चेतना रथयात्रेने गुरूवार, १ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास गोंदिया पोचली. या यात्रेच्या माध्यमातून शहर भ्रमंतीसह सभांद्वारे ८ डिसेंबरला निघणाऱ्या मोर्च्यात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ, गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व ओबीसी सेवा संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या ओबीसी जनचेतना अभियानाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही चेतना यात्रा काल गुरूवारला गोंदिया शहरात दाखल होताच भव्य स्वागत करण्यात आले. कुडवा येथे रथाचे स्वागत झाल्यानंतर शेकडो नागरिकांनी आपल्या बाईकने रॅली काढून जय ओबीसीचा जल्लोष केला. शहर भ्रमंती झाल्यानंतर रलीचा समारोप करण्यात आला. या बाईक रॅलीत ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे, भंडारा गोंदिया समन्वयक जीवन लंजे, संतोष वैद्य, कैलाश भेलावे, खुशाल कटरे, गणेश लाडेकर, बन्सीधर शहारे, रेशीम कापगते, अमर वऱ्हाडे, मनोज मेंढे, खेमेंद्र कटरे, सुनील भोंगाळे, प्रेम साठवणे, शिषीर कटरे, संजीव रहांगडाले, उमेंद्र भेलावे, चंद्रकुमार बहेकार, अशोक पडोळे, मुकूंद धुर्वे, छोटू सोमनकर, गणेश बर्डे, गौरीशंकर डोंगरे, सुनील पटले, सत्यम बहेकार, एस.यु.वंजारी, भक्तराज भेलावे, सुनील तिडके, दिलीप बीरनवार, राजा रहांगडाले, एच.डी.आगासे, अनिल मदनकर, केशवराव शेंडे, योगराज साखरवाडे, निलेश पटले, गुलाब लिल्हारे, माधोराव भोयर, गौरव चामट, संदीप पटले, तुषार उके आदिंसह शेकडोंची उपस्थिती होती. आज शुक्रवारला ही रथयात्रा आमगावकडे रवाना झाली.