25.1 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ युवा स्वभिमानीचा विधानभवनात बळजबरी प्रवेश

युवा स्वभिमानीचा विधानभवनात बळजबरी प्रवेश

0
19

नागपूर,दि.09-आज युवा स्वाभिमानी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांनी थेट विधानभवनाच्या आत शिरण्याचा प्रयत्न केला.धानाला समर्थन मुल्याचे भाव देण्यात यावे,धानाचा चुकारा त्वरीत देण्यात यावे, उसाला ५०० बोनस देण्यात यावा आणि शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात यावे अशा मागण्या धरत त्यांनी जोरदार नारेबाजी केली. ज्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले. यामध्ये गोंदिया जिल्हा स्वाभीमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे व टोकेश हरीनखेडे यांचा समावेश आहे.

blank