26.6 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home क्रीडा अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट, सर्वोच्च न्यायालयाचा दणका

अनुराग ठाकूर बीसीसीआयमधून आऊट, सर्वोच्च न्यायालयाचा दणका

0
30

नवी दिल्ली, दि. 2 – सर्वोच्च न्यायलयाने कडक कारवाई करत अनुराग ठाकूर यांनी बीसीसीआयच्या प्रमुख पदावरुन हटवलं आहे. लोढा समितीच्या शिफारसी लागू न केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. अनुराग ठाकूर यांच्यासोबतच अजय शिर्केनाही पदावरुन हटवण्यात आलं आहे. तुमच्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणाही सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर यांच्याकडे केली असून उत्तर मागितलं आहे. 18 जुलै 2016 रोजी आपण दिलेल्या आदेशाचं अनुराग ठाकूर आणि अजय शिर्के यांनी पालन न केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. 19 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे.