कुणाला पैसे तर कुणाला परिवाराची चिंता – मोदी

0
4

लखनऊ(वृत्तसंस्था)दि.02 – पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी येथील रमाबाई आंबेडकर मैदानात आयोजित परिवर्तन रॅलीला संबोधित करत आहेत. लखनऊमध्ये मोठ्या संख्येने जमा झालेल्या लोकांचे मोदींनी सभेच्या सुरुवातीलाच आभार व्यक्त केले. मोदी म्हणाले, माझ्या आयुष्यातील ही सर्वात मोठी रॅली आहे.उत्तर प्रदेशमध्ये वेगवेगळे पक्ष आपापले स्वार्थ साधण्यात गुंतले आहेत, राज्यात नाममात्र उरलेला पक्ष आपल्या नेत्यासाठी राजकीय जमीन तयार करण्यासाठी धडपडतो आहे. तर एक पक्ष पैसे कुठल्या बँकेत जमा करायचे या चिंतेत आहे. या बँकेतून त्या बँकेत त्यांची पळपळ सुरू आहे, तर आणखी एक पक्ष आपले तुटणारे कुटुंब कसे वाचवाचये या चिंतेत आहे. अशा शब्दात काँग्रेस, बहुजन समाजवादी पक्ष आणि समाजवादी पक्षावर नाव न घेता घणाघाती टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या उत्तर प्रदेशमधील परिवर्तन अभियानाची सुरुवात केली.
शेतकऱ्यांनी कडधान्य घेतले. देशातील जनतेला डाळ स्वस्त मिळावी यासाठी शेतकऱ्यांना डाळींचे उत्पादन वाढविण्याचे सांगितले. त्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले, मात्र राज्यसरकार त्या डाळीला खरेदी करत नसल्याचा आरोप मोदींनी केला.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष हे कायम एकमेकांच्या विरोधात असतात मात्र मोदी हटावसाठी दोन्ही विरोधक एकत्र आले.मी म्हणतो, काळेधन संपले पाहिजे ते म्हणतात मोदी हटाव.
मोदी म्हणाले, काही दिवसांपूर्वीच आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने भीम अॅप सुरु केले, तर काही लोकांच्या पोटात का दुखत आहे.भीम अॅपच्या माध्यमातून देशातील गरीबातील गरीब डिजिटल व्यवहार करणार आहे. बाबासाहेबांनी 80 वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकची संकल्पना मांडली होती. हे अॅप त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली आहे.