23.3 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home राजकीय मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच – शरद पवार

मोदींनी केलेली स्तुती ऐकून मी मेलोच – शरद पवार

0
23

नाशिक,(वृत्तसंस्था) दि. 5 – मोदींनी माझे बोट धरून राजकारणात आल्याचं म्हटलं, त्यांचे हे कौतुकास्पद उद्गार ऐकून मी मेलोच, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोलेबाजी केली. मोदी बोलायला फारच हुशार असल्याचं म्हणत पवारांनी मोदींवर उपरोधिक टीकाही केली. नाशिकमधील पिंपळगावच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पवारांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करून खिल्लीही उडविण्याचा प्रयत्न केला. पुणे येथील मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यातील भाषणादरम्यान मोदींनी पवारांवर स्तुतीसुमने उधळली होती. त्याच पार्श्वभूमीवर पवारांनी ही टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी भाजपाचा मित्रपक्ष आणि सत्तेतील सहकारी असलेल्या शिवसेनेकडून नोटाबंदीबाबत सातत्याने होणारी टीका, नोटाबंदीचा शेतक-यांवर होणार परिणाम यावरही भाष्य केले.

blank