22.7 C
Gondiā
Thursday, July 23, 2026
Home मराठवाडा/खान्देश राजधानी एक्सप्रेसपेक्षाही कमी भाडे एअर इंडियाचे

राजधानी एक्सप्रेसपेक्षाही कमी भाडे एअर इंडियाचे

0
35

नवी दिल्ली, दि. 5 – विमान प्रवास करणा-यांसाठी सरकारी विमान सेवा देणारी कंपनी एअर इंडिया खास ऑफर घेवून आली आहे. एअर इंडियाच्या या ऑफरद्वारे लवकरच राजधानी एक्सप्रेस पेक्षाही कमी भाड्यात विमान प्रवास करता येणार आहे. ज्या मार्गांवर राजधानी एक्सप्रेस धावते त्या मार्गांवरील प्रवासासाठी एअर इंडियाकडून ही ऑफर देण्यात येणार आहे.

शुक्रवार (दि. 6 )पासून ही ऑफर सुरू होत असून ती 30 एप्रिलपर्यंत असणार आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी 20 दिवस अगोदर तिकीट बूक करावं लागणार आहे. एअर इंडियाची अधिकृत वेबसाइट, ऑफिस किंवा ट्रॅव्हल एजंट यांच्याकडे तिकीट बूक करता येईल.

या ऑफरनुसार मुंबई ते दिल्लीचं भाडं हे 2401 रूपये इतकं असणार आहे. दुसरीकडे याच मार्गावरील प्रवासाला राजधानी एक्सप्रेसच्या 3 एसीच्या तिकीटासाठी 2595 रूपये, 2 एसीसाठी 3860 रूपये तर फर्स्ट एसीसाठी 4755 रूपये मोजावे लागतात.एअर इंडियाने ही ऑफर लॉन्च करण्यापूर्वी अन्य विमान सेवा देणा-या कंपन्याही अनेक ऑफर घेवून आल्या आहेत.

blank