भजेपारात अवतरली मोझरी
गोंदिाया,दि.19 — भजेपार येथील अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळाच्या वतीने ११ ते १८ जानेवारी दरम्यान श्रीमद्् ग्रामगीता भागवत ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान वंदनीय राष्टÑसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगितेचा जागर करण्यात आला. राष्टÑसंतांची पालकी व शोभायात्रेने गाव दुमदुमले.
अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ भजेपारच्या वतीने यंदा राष्टÑसंत तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी सप्ताह विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सप्ताहभर ग्रामगितेवर आधारीत प्रवचन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबीर, महिला मेळावा, गोपाल काला आणि मुली आणि मुलांसाठी विविध प्रशिक्षण घेण्यात आले. दरम्यान सातही दिवस मोझरी येथील ग्रामगिताचार्य रायजी प्रभू सेलोटकर महाराज यांनी श्रीमद् ग्रामगिता भागवतातून ग्रामस्थांना तथा गुरूदेव उपासक, उपासीकांना ग्रामगितेमधील बोधामृत पाजला. सकाळी ७ वाजतापासून ते रात्री १० वाजतापर्यंत सप्ताहभर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. राष्टÑसंत तुकडोजी महाराजांची पालकी व शोभायात्रा तथा रामधुनने भजेपार गाव दुमदुमल्याने या गावात मोझरी अवतरल्याचा भास होत होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष कृष्णकुमार चुटे, उपाध्यक्ष रामजी चुटे, सचिव टायकराम ब्राम्हणकर, कार्याध्यक्ष सेवकराम बहेकार, सहसचिव योगराज पाथोडे, कोषाध्यक्ष एकनाथ बहेकार, संघटन अध्यक्ष धनराज बहेकार, सर्वाधिकारी कृष्णकुमार चुटे आदिंसह गुरूदेव उपासक-उपासिका व समसत भजेपार ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण सप्ताहभर हागणदारीमुक्त गाव आणि स्वच्छता अभियानावर विशेष भर देण्यात आला.





