30.2 C
Gondiā
Saturday, July 11, 2026
Home विदर्भ जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका

जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाचा ठपका

0
22

गोंदिया दि.१९ :: माहितीच्या अधिकाराखाली जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी तिरोडा तालुक्यात आॅगस्ट २०१४ ते जुलै २०१५ या काळात केलेला दौरा दैनंदिनी व गावात भेटी दिलेल्या व्हिजीट बुकची साक्षांकीत प्रत देण्याची मागणी करण्यात आली होती.परंतु यावर माहिती न देणाऱ्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयुक्त यांनी शिस्तभंगाचा ठपका ठेवत स्पष्टीकरण मागीतले आहे.

तिरोडा तालुक्यातील किती गावातील बांधकामाची पाहणी करून मुल्यांकन प्रमाणपत्र व पूर्णत्वाचे प्रामणपत्र देण्यात आले. याची साक्षांकरीत सत्यप्रत देण्याचीमागणी करण्यात आली. परंतु जन माहिती अधिकारी यांनी विहीत मुदतीत कोणताही प्रतिसाद दिला नाही. माहिती न मिळाल्याने प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे सुनावणी घ्यायला पाहिजे होती परंतु ते ही घेण्यात आली नाही. माहिती न मिळाल्याने आयोगाकडे द्वितीय अपील सादर केल्याने आयोगाने त्यावर सुनावणी ठेवली. सुनावणीच्या दिवशी अपिलार्थी हजर होते. परंतु जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी गैरहजर होते. कुठलीही सूचना न देता अधिकारी गैरहजर होते.त्यामुळे अपिलार्थ्याला १५ दिवसाच्या आत सदर माहिती विनामूल्य देण्यात यावी व ३० दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश जनमाहिती अधिकारी तथा जिल्हा समाज कल्याण कार्यालय जि.प.गोंदिया यांना देण्यात आले.