25.7 C
Gondiā
Thursday, July 2, 2026
Home राजकीय युती तुटली हे चांगलेच झाले – अबू आझमी

युती तुटली हे चांगलेच झाले – अबू आझमी

0
40

नाशिक, दि. 27 – शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी सरकारातील सहभागावर लात मारून बाहेर पडावे असे मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज नाशिक मध्ये व्यक्त केले. नाशिक मध्ये महापालिका निवडणुकीसाठी आलेल्या आझमी यांची आज सायंकाळी वडाळा रोडवरील एका हॉटेल मध्ये पत्रकार परिषद झाली यावेळी आझमी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपले राजकीय मतभेद होते, मात्र ते ठोस भूमिका घेत. उद्धव ठाकरे यांना अशी भूमिका घेता येत नसल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे यांचे कोणतेही राजकीय अस्तित्व नसतांना केवळ त्यांच्या गुंडगिरी मूळे सरकार हवे तसे निर्णय घेते आणि बॉलिवूड ला सेटलमेंट करण्यास भाग पडते अशी टीका आझमी यांनी केली.