32.9 C
Gondiā
Sunday, June 28, 2026
Home विदर्भ आज ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

आज ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ

0
23

गोंदिया,दि.३१ : आजी, माजी आणि शहिद सैनिकांच्या अवलंबीतांच्या पुनर्वनासाठी देशात ध्वजदिन साजरा करण्यात येतो. हा निधी माजी सैनिक/विधवांच्या कल्याणकारी योजनांसाठी वापरल्या जातो. ध्वजदिन निधी २०१६-१७ च्या संकलन शुभारंभाचा कार्यक्रम आज ३१ जानेवारीला दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे उपस्थित राहणार आहेत. यावेळी ज्या कार्यालय प्रमुखांनी व कर्मचाऱ्यांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी २०१५ मध्ये उत्कृष्ट संकलन केले आहे त्यांचा देखील यावेळी प्रशस्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.