पोलीस आयुक्तांनी केली चूक मान्य

0
4

नागपूर, दि. 31 – हे राम, नथुराम ! नाटकाचा निषेध नोंदवून आंदोलकांना गोळी घालण्याची धमकी देणारे फलक दाखविल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले पोलीस आयुक्त सोमवारी अखेर नमले. तब्बल अडीच तास काँग्रेस नेत्यांना ताटकळत ठेवल्यानंतर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम आयुक्तालयात आले. त्यांनी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करताना वादग्रस्त फलकाबाबत चूक झाल्याचे मान्य केले आणि भविष्यात पुन्हा असा प्रकार घडणार नाही, त्याची काळजी घेतली जाईल, अशी हमी दिली. दरम्यान, काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यासाठी आणलेली जनरल डायरची पदवी, शाल आणि श्रीफळ पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेसी यांना दिले आणि या वादावर पडदा पडला. यानंतर पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस आयुक्तांचे वर्तन निषेधार्ह असून आपण त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांवर कारवाई केली नाही तर विधिमंडळाच्या अधिवेशनात हक्कभंगाचा प्रस्ताव आणू, अशी महिती पत्रकारांना दिली.२२ जानेवारीला देशपांडे सभागृहासमोर हे राम नथुराम या वादग्रस्त नाटकाच्या प्रयोगाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आंदोलन करून विरोध दर्शविला. पोलिसांनी या आंदोलकांना एक फलक दाखवला.