गोंदियात आंतरराज्य पेंटीग प्रदर्शनाचे आयोजन

0
14

गोंदिया,दि.31-गोंदिया शहरातच नव्हे तर जिल्ह्यात पहिल्यांदाच पेंटीग प्रदर्शनाचे आयोजन गोंदियाच्या घनश्यामदास केलनका सभागृहात करण्यात आले आहे.गोंदिया आर्ट क्रियेशन व गोंदिया लांयस क्लबच्यावतीने आयोजित या पेंटिग(चित्रकला) प्रदर्शनात महाराष्ट्र ,मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील ५० चित्रकरांनी आपले उत्कृष्ठ असे पेंटीग लावले आहे.गेल्या तीन दिवसात पाच हजार प्रेक्षकांनी या प्रदर्शनाला भेट दिली आहे.
गोंदिया सारख्या अतिदुर्गम नक्षलग्रस्त जिल्ह्यातील चित्रकाराच्या कलेला वाव मिळावे यासाठी गोंदिया आर्ट क्रिएशन आणि गोंदिया लायंस क्लबच्या संयुक्त विद्यमाने गोंदियातील अग्रेसन भवन येथील केलनका सभागृहात तीन दिवसीय पेंटींग प्रदर्शनी भरविण्यात आली असून कलावंतासह सामान्य प्रेक्षकांनी हजेरी लावत पेंटींग खरेदी केल्या आहेत.विशेष म्हणजे आज मुंबई ,पुणे ,नागपूर या सारख्या मोठ्या शहरात पेंटींग प्रदर्शनी भरविली जाते.त्या ठिकाणी महागड्या पेंटींग असतात,त्यामुळे जिल्ह्यातील इच्छुक तेथे पेंटींग खरेदी करू शकत नसल्याने गोंदिया आर्ट कि्एरशनचे संचालक चंचल अग्रवाल यांनी गोदियातच प्रदर्शन भरविण्यासाठी चित्रकारांशी संपर्क केला.परिसरातील चित्रकारांनी तसेच गोंदिया जिल्याच्या बाजूला लागून असलेल्या मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ राज्यातील चित्रकरांनी स्वतःच्या हातून तयार केलेल्या बोलक्या चित्रकला दर्शविणाऱ्या एका आंगड्या वेगळ्या प्रदर्शनीचे आयोजन केले आहे.या प्रदर्शनात १००० रुपयापासून १०००० रुपया पर्यत पेंटींग उपलब्ध आहेत.