24 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ नरभक्षी वाघ अखेर पिंजऱ्यात बंद

नरभक्षी वाघ अखेर पिंजऱ्यात बंद

0
34

चंद्रपूर ,दि.01- मागील २३ दिवसापासुन सिंदेवाही तालुक्यात धुमाकुळ माजवीना-या नरभक्षी वाघाला शिवणी गावालगतच्या जंगलात बेशुद्ध करुन वन विभागाने अखेर पिंजऱ्यात बंद केले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाला पकडण्यासाठी जंगलामध्ये कॅमेरे लाऊन वाघावर पळत ठेवली तसेच वाघाला पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला होता. बऱ्याच दिवसांपासून वनविभागाला गुंगारा देत असलेल्या वाघाला अखेर आज सकाळी सात वाजताच्या सुमारास पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले. या वाघाला ताडोबा – मोहुर्ली जंगलात सोडणार असल्याची माहिती वन विभागाचा सुत्रांनी दिली.