23.9 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ विद्यार्थिनीच्या भितीने मुख्यमंत्र्यांनी गुंडाळली सभा

विद्यार्थिनीच्या भितीने मुख्यमंत्र्यांनी गुंडाळली सभा

0
19

बुलडाणा,दि.१०-बुलडाणा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज १० फेबुवारीला येथे आले असता त्यांना भेटून राजकारण व समस्या यावर बोलायचे आहे असे म्हणत मंचाकडे जाणाèया एका विद्यार्थीनीमूळे मुख्यमंत्र्यांनाही आपली जाहिर प्रचार सभा आटोपती घेण्याची वेळ आल्याचा प्रसंग घडला.
डोंगरसेवली येथील इयत्ता ११ वी शिकणारी दिपाली शुभाष सावळे या विद्यार्थिनीने सभेतून उठून स्टेजकडे जात असताना पोलीसांनी ताब्यात घेतले.तेव्हा आपणास मुख्यमंत्र्याशी भारतीय राजकारण आणि समस्या यावर बोलायचे आहे असे पोलिसांना सांगत होती.परंतु पोलीसांनी मात्र तिला भेटू दिले नाही.अति.पोलीस अधिक्षक श्रीमती खेडकर यांनीही दिपालीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.पण आपल्या भेटण्याचा व बोलण्याचा अटीवर कायम राहत ती रडू लागली.विशेष म्हणजे मुख्यमंत्री सभेकरीता आले तेव्हा लोकांची गर्दीच नव्हती.त्यामुळे ही सभा तब्बल तासानंतर उशीरा सुरु करण्यात आली होती.

blank