नोटबंदी नंतर पैसे नसल्याने ४०० अतिरेक्यांचे आत्मसंपर्पण-रावसाहेब दानवे यांचा दावा

0
9

वर्धा दि..१०: मोदी सरकारने नोट बंदी केल्यानंतर शत्रू राष्ट्राने भारतात पाठवलेल्या अतिरेक्यांजवळ परत जाण्यासाठी पैसे राहिले नाही त्यामुळे ४०० अतिरेक्यांनी आत्मसर्पण केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. देशात अतिरेकी आले मात्र परत त्यांना परत जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी समर्पण केले असल्याचे दानवे म्हणाले. वर्धा जिल्हापरिषद निवडणुकीच्या येळाकेळी येथे झालेल्या प्रचार सभेत रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केले आहे.
नोटबंदीचा फटका हा मोठमोठ्या उदयॊग पतींना बसला आहे . सामान्य माणसाला याचा फटका बसला नाही . नोटबंदी झाली त्या दिवशी काँग्रेस नेत्यांच्या खिश्यात नोटांऐवजी कागदच राहिलेत . काँग्रेसने एक रुपयापासून ते पाच रुपयांपर्यंतच्या नोटा बंद केल्या आम्ही मात्र मोठ्या लोकांच्या मोठ्या नोटा बंद केल्या आहेत असेही ते म्हणाले .
एका काळात भारतीय जनता पक्षात उमेदवार नव्हते पण आज परिस्थिती बदलली आहे . भाजपात प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे . पक्ष मोठा झाल्या आणि पक्षात बंडखोरया सुरु झाल्या . अडीच वर्षात सरकारने काय केले . मतदानानंतर मतदारांनी आमदार व खासदाराला तुम्ही अडीच वर्षात काय केले हे विचारण्याची वेळ आहे . वर्ध्यातील आमदार व खासदाराला येथील जनतेने अडीच वर्षात यांनी काय केले याचा हिशोब घ्यायला पाहिजे , पण मतदार हा हिशोब घेतच नाहीत . शेतकरी शेतात शीलाने ठेवलेल्या सालदारला कामाचा हिशोब मागतो पण आमचा हिशोब कुणी घेतच नाही . त्यामुळे मतदारांना येथील आमदार आणि खासदारांना कामाचा हिशेब मागण्याचे आवाहन केले आहे .