24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home राजकीय युवा स्वाभिमान भाजपसोबत

युवा स्वाभिमान भाजपसोबत

0
30

नागपूर दि.१५: भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग ३७ मधील उमेदवारांना मतदारांचा पाठिंबा वाढत असतानाच आ. रवी राणा यांच्या नेतृत्वातील युवा स्वाभिमान पार्टीने आज त्यांचा पाठिंबा लेखी स्वरूपात भाजपला जाहीर केला. पार्टीचे शेखर बिसेन आणि शहराध्यक्ष नीलेश बोपचे यांनी आज तसे पत्र आयुक्तांकडे सोपविले असून भाजपा उमेदवारांना याची प्रत दिली. याविषयी बोलताना युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष म्हणाले, भाजपचे प्रभाग ३७ मधील उमेदवार प्रमोद तभाने, दिलीप दिवे, सोनाली कडू, नंदा जिचकार हे निवडून यावेत यासाठी पार्टीचे सर्व कार्यकर्ते झटणार आहेत. युवा स्वाभिमानाचे शेकडो कार्यकर्ते आता भाजपाच्या उमेदवारांच्या विजयासाठी मैदानात उतरणार असून या घडामोडीमुळे प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. हे पत्र भाजपच्या उमेदवारांना सोपविले. यावेळी भाजपचे प्रभाग संयोजक श्रीवास्तव, बंडू गायकवाड आदी उपस्थित होते.