24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या :आ. रहांगडाले

जलयुक्त शिवारच्या कामांना गती द्या :आ. रहांगडाले

0
23

तिरोडा दि. १६: जलयुक्त शिवार योजनेची कामे दिलेल्या वेळेत पुर्ण करा, तथा नवीन कामांचे नियोजन करून तातडीने सुरू करा, असे आदेश आमदार विजय रहांगडाले यांनी अधिकार्‍यांना दिले. जलयुक्त शिवाय अभियानाचे कामांचा आढावा घेण्यासाठी आमदारांच्या उपस्थितीत सभा घेण्यात आली. यावेळी आ. रहांगडाले यांनी झालेल्या कामांची विस्तृत माहिती अधिकार्‍यांकडून घेतली. प्रलंबित असलेल्या कामांना मार्च पूर्वी पुर्ण करण्याचे आदेश दिले. दरम्यान जलयुक्त शिवार माध्यमातून महाराष्ट्र राज्यात एक आपल्या जिल्ह्यातून मॉडल तयार व्हावे, यासाठी गोरेगाव तालुक्यातील सोनेगाव येथे कामाचे नियोजन सुरू असल्याचे ते म्हणाले. सभेला उपविभागीय अधिकारी सुनिल सूर्यवंशी, तहसीलदार रविंद्र चव्हाण, कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी हिरालाल मानकर, हरिणखेडे, पोटदुखे, मंगेश वावधने, प्रशांत उरकुडे तसेच संबंधीत विभागाचे तांत्रिक अधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

blank