23.5 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ गायमुख मंदिर परिसरातील जंगलात आग

गायमुख मंदिर परिसरातील जंगलात आग

0
30

तुमसर दि.२६-: गायमुख मुख्य यात्रा स्थळापासून हाकेच्या अंतरावर लोहारा रस्त्यावर अज्ञात इसमांनी जंगलव्याप्त परिसरात आग लावली. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. वणवा पेटलेल्या जागेपासून १० ते १२ फूट अंतरावर चारचाकी वाहनतळ होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही आग लागली होती.गायमुख येथे महादेवाची मोठी यात्रा भरते. सातपुडा पर्वत रांगात हे यात्रा स्थळ आहे. दीड ते दोन लाख भाविक यात्रेनिमित्त येतात. शुक्रवारी रात्री लोहारा मार्गावरील या जंगलात आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीनंतर वाहनधारकांनी वाहने तिथून हलविले. अन्यथा अनर्थ घडला असता.
मोहाडी तालुक्यातील गायमुख यात्रास्थळी तुमसर, मोहाडी तालुक्यातील पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी राहतात. आग कुणी लावली याची माहिती कुणालाही नाही. आगीचे लोळ दिसल्याने एकच धावपळ उडाली. परतीच्या मार्गावर ही आग असल्याने भाविकांनी काढता पाय घेतला. हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त आहे. जंगलातील झाडांची पाने गळून पडल्याने पालापाचोळा व गवत सध्या वाळलेले आहे. त्यामुळे आग जंगल परिसरात लवकर पसरते. रस्त्याच्या दुसऱ्या बाजुला भाविकांचे जत्थे होते. त्यांच्यात भीतीचे सावट पसरले होते.

blank