24.5 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ भंडारा पंचायत समितीलाही यशंवत पुरस्कार

भंडारा पंचायत समितीलाही यशंवत पुरस्कार

0
23

भंडारा ,दि.17: राज्य शासनाच्या यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात अव्वल ठरलेल्या भंडारा पंचायत समितीला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्यपाल सी. विद्यासागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात गुरुवारला हा पुरस्कार वितरण समांरभ पार पडला.

यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, राज्याचे मुख्य सचिव सुमित मलीक, ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव असीमदास गुप्ता, गिरीश भालेराव उपस्थित होते. हा पुरस्कार भंडारा पंचायत समितीच्या खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, सभापती प्रल्हाद भुरे,उपसभापती ललित बोंद्रे, विस्तार अधिकारी प्रमोद हुमणे यांनी स्वीकारला.यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या भंडारा पंचायत समितीला नागपूर विभागाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला. या पुरस्कारात ९ लाख रूपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पंचायत समितीला सन्मानित करण्यात आले.