24 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ मारहाणप्रकरणानंतर आज पहिली स्थायी समितीची सभा

मारहाणप्रकरणानंतर आज पहिली स्थायी समितीची सभा

0
18

गोंदिया,दि.21-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सभागृहात 3 एप्रिल रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जि.प.सदस्या यांच्यात झालेल्या मारहाणप्रकरणानंतर आज शुक्रवारला स्थायी समितीची सभा होत आहे.या स्थायी समितीच्या सभेला ज्या सभापतीवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे ते पी.जी.कटरे सुध्दा उपस्थित राहणार आहेत.तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गंगाधर परशुरामकर सुध्दा स्थायी समितीचे सदस्य असल्याने आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.गेल्या बैठकीतील मारहाणीवर चर्चा होते की शांतपणे बैठक पार प़डते याकडे नजरा खिळून आहेत.विशेष म्हणजे अनुसूचित जाती जमाती कायद्यांतर्गत गुन्ह्यात सभापती पी.जी.कटरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून अटकपुर्व अग्रीम जामीन मिळविला आहे.