31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ पर्यटनातून रोजगार निर्मितीवर भर : नाना पटोले

पर्यटनातून रोजगार निर्मितीवर भर : नाना पटोले

0
26
भंडारा,दि.30 : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर भर असून याबाबत खा. नाना पटोले यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री रावल यांचेशी मुंबई येथे भेट घेऊन चर्चा केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नागझिरा, नवेगाव बांध, कोका अभयारण्य अशी अनेक पर्यटनस्थळ आहेत. पर्यटनस्थळांच्या विकासाकरिता निधी मंजूर नवीन प्रशासकीय कामांना मंजूरी देऊन लवकरात लवकर पर्यटन विकास करावा. या पर्यटन विकासातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळू शकतो. प्रादेशिक पर्यटन विकासासंदर्भात खा. नाना पटोले यांनी राज्याचे पर्यटन विकास मंत्री रावल यांचेशी चर्चा केली. पवनी तालुक्यातील उमरेड-कर्‍हांडला व्याघ्र येथून मागील अनेक महिन्यांपासून ‘जय’ वाघ बेपत्ता आहे. जय हा व्याघ्र प्रकल्पात येणार्‍या पर्यटकांचा केंद्रबिंदू असून आकर्षण होता. जय बेपत्ता असल्यापासून पर्यटकांची संख्या कमी झाली. या विषयावर सुद्धा खा. नाना पटोले यांनी पर्यटन विकास मंत्री रावल यांचेशी चर्चा करतांना माहिती दिली.