34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home क्रीडा ६ मे रोजी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे लोकार्पण

६ मे रोजी क्रीडा संकुलातील जलतरण तलावाचे लोकार्पण

0
35

गोंदिया,दि.४ : जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे बांधण्यात आलेल्या जलतरण तलावाचा लोकार्पण सोहळा ६ मे रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते जलतरण तलावाचे लोकार्पण करण्यात येईल. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार गोपालदास अग्रवाल असतील. यावेळी खासदार सर्वश्री प्रफुल पटेल, नाना पटोले, अशोक नेते, आमदार सर्वश्री प्रा.अनिल सोले, डॉ.परिणय फुके, नागो गाणार, विजय रहांगडाले, संजय पुराम, जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, नगराध्यक्ष अशोक इंगळे यांची विशेष उपस्थिती तर जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय नागपूर विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींनी जलतरण तलावाच्या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार यांनी केले आहे.

blank