पिडीत कामगारास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी मालकाची- न्या.श्रीमती जरुदे

0
23

गोंदिया,दि.४ : देशाच्या विकासात कामगार वर्गाचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच कामगारांचे हित जोपासण्यासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. कामगारांना योग्य न्याय मिळावा यासाठी कायदेही तयार करण्यात आले आहे, त्यापैकीच एक कायदा कामगार नुकसान भरपाईचा असून या कायदयाअंतर्गत कामाच्या ठिकाणी किंवा कामावर जातांना दुर्घटना झाल्यास पिडीत कामगारास किंवा त्याच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी ही संबंधित मालकाची आहे. असे प्रतिपादन न्या.श्रीमती ए.एस.जरुदे यांनी केले.
गोंदिया एसटी आगारात १ मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून न्या.श्रीमती जरुदे बोलत होत्या. यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून न्या.वासंती मालोदे, आगार व्यवस्थापक जयकुमार इंगोले, आगाराचे कार्यशाळा अधीक्षक नितीन झाडे व सहायक वाहतूक अधिकारी संजना पटले यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्या.मालोदे म्हणाल्या, कंत्राटी कामगार अधिनियम १९७० नुसार कामगारांना सर्वप्रकारच्या सुविधा नियोक्त्याने पुरविणे बंधनकारक आहे. या कायदयाअंतर्गत जोखमीच्या ठिकाणी १४ वर्षाखालील बालकांना कामावर घेण्यास प्रतिबंध आहे. कामगारांची मोफत वैद्यकीय तपासणी, कामाचा योग्य मोबदला दिला पाहिजे असे त्यांनी सांगून कामाराच्या हिताच्या दृष्टीने असलेल्या विविध कायदयाची माहिती त्यांनी यावेळी दिली.
प्रास्ताविकातून श्री.झाडे यांनी सांगितले की, जर कोणत्याही कामागाराव अन्याय झाला असेल तर त्याने न्याय मागण्यासाठी न्यायालयात अवश्य जावे. न्यायासाठी मोफत विधी सेवेचा लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला एसटी आगारातील अनेक कामगार उपस्थित होते. यशस्वीतेसाठी बस आगारातील सुरेंद्र भिमटे, विठ्ठल राणे, मनिषा धोटे, सुजित डोंगरे, अर्पित वासनिक व‍ जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातील अधीक्षक एस.जी.कान्हे, जी.एस.ठवकर, एस.यु.थोरात, श्रीमती डी.ए.थोरात व आर्यचंद्र गणवीर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार ॲड.श्रीमती एम.पी.चतुर्वेदी यांनी मानले.