25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ बालिकांच्या पालकांना भेटण्याचे आवाहन

बालिकांच्या पालकांना भेटण्याचे आवाहन

0
22

गोंदिया,दि.१७ : ११ एप्रिल २०१७ रोजी रेल्वे स्टेशन गोंदिया परिसरात दोन बालिका कु.पुजा वय ४ वर्षे आणि कु.शालु वय २ वर्षे हया मुली भिक मागतांना रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना आढळून आल्याने त्यांनी सदर बालिकांना बाल कल्याण समिती गोंदिया यांचे समक्ष सादर केले असता समितीच्या आदेशानुसार सदर बालिकांना वरधान शिशुगृह नागपूर येथे तात्पुरते दाखल केले आहे. या बालिका आपले नावाव्यतिरिक्त दुसरे काहीही सांगत नसल्यामुळे त्यांचे जैविक माता-पिता, नातेवाईकांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी कार्यालय, अंगूर बगीचा रोड, गजाजन कॉलनी, गोंदिया येथे भ्रमणध्वनी क्रमांक ७७०९६६१०४६, ९४०५९८५३४९ यावर संपर्क साधावा. असे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गोंदिया यांनी कळविले आहे.

blank